Posted by: राजकुमार मडनोली | जानेवारी 16, 2014

जीवनाचा अर्थ…………..

1 . जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर
तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
2. बचत म्हणजे काय
आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून
… … शिकावं.
3. गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत
बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे
म्हणत हसणे उतम !
4. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते
5. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद
देतो; भविष्यकाळ
आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण
आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
6. मृत्यूला सांगाव, ये ! कुठल्याही रुपाने
ये.. पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत
माझ्याकडे आहे तोपर्यंत
तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
7. मोती बनून शिंपल्यात
राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन
चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
8. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात
तो कधीही एकटा नसतो.
9. जखम करणारा विसरतो पण जखम
ज्याला झाली तो विसरत नाही.
10. आपण पक्षाप्रमाणे आकाशात
उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात
पोहायला शिकलो पण जमिनीवर
माणसासारखे वागायला शिकलो का ??

एका मुलाच्या गर्लफ्रेंड चा वाढदिवस असतो,
.
पण तो मुलगा वाढदिवसाच्या आगोदरच्या दिवशीच
काही निमित्त दुसर्या गावी जातो.
.
.
तो फुल वाल्याला २४ गुलाबाचे फुलं
तिच्या घरी पाठवायला सांगतो,
.
.
आणि तिला फोन करून म्हणतो,”
प्रिये…मी तुझ्यासाठी तितके फुलं पाठवली आहेत
जितक्या वर्षांची तू झाली आहेस…”
.
.
फुल वाल्याकडे बरीच फुलं शिल्लक राहिलेली असतात
म्हणून तो विचार करतो ,
” चला १०-१२ फुलं जास्त द्यावे….मुलगी खुश होईल…’
.
.
.
म्हणून त्याने २४ एवजी ३४ फुलं दिले…..!
आणि आजपरियंत मुलाला समजलं नाही की त्याचं ब्रेकप का झाल… 

Posted by: राजकुमार मडनोली | मे 29, 2013

पुन्हा एकदा परत ये . . . .

पुन्हा एकदा परत ये ,
आणि येशील तेंव्हा फक्त माझ्यासाठीच ये ,

जर कधी आठवण आलीच माझी ,
तर एक उचकी होऊन फक्त एकदाच ये ,

त्रास होयील मला थोडा या उचकीचा ,
पण क्षणभर मिळणाऱ्या आनंदासाठी तरी ये ,

कदाचित जमणार नसेल हि तुला आता पुंन्हा येण ,
पण सोबत पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करायला फक्त एकदाच ये ,

सोबत मिळाली आहे तुलाही तुझ्या नवीन संसाराची ,
पण असेलच ना माझ्याकरिता पण देवाने सातजल्मासाठी बांधलेली कुणी …

जरी बांधलो गेलो असलो आपण सातजल्मासाठी,
तरी आठवा जल्म घेऊन फक्त माझ्यासाठीच ये ,

कदाचित म्हणशील हि पुन्हा मला अजून हि तू वेडाच आहेस,
पण अर्धवट आहे प्रेम अजून आपल ,ते पूर्ण करायला फक्त एकदाच परत ये….

Posted by: राजकुमार मडनोली | मे 29, 2013

नाती ही अशीच असतात…

कधी रुसतात कधी हसतात
तरी सर्वांच्या मनी वसतात
नाती ही अशीच असतात… ♥♥
.
कुठे जुळतात कुठे दुरावतात
ईथे मिळतात तिथे हरवतात
नाती ही अशीच असतात… ♥♥
.
काही फ़ुलतात काही कोमेजतात
आठवणी देतात विसरुन जातात
नाती ही अशीच असतात… ♥♥
.
वर्षानू वर्षाची अनोळखी वाटतात
काही क्षणात आपलीसीहोतात
नाती ही अशीच असतात.. ♥♥

Posted by: राजकुमार मडनोली | मे 29, 2013

सुंदर मुलगी

एका पार्टीत एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते.
तुम्ही तिच्यापाशी जाऊन सांगता,”मी खूप श्रीमंत आहे.माझ्याशी लग्न कर.”
याला म्हणतात,”डायरेक्ट मार्केटिंग!!!”

एका पार्टीत एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते.
… तुम्ही तिच्याकडून तिचा फोन नंबर मिळवता आणि फोन करून तिला सांगता,
मी खूप श्रीमंत आहे.माझ्याशी लग्न कर.”
याला म्हणतात,”टेली मार्केटिंग!!”

एका पार्टीत एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते.
तुमच्या मित्रांपैकी एक जण तिच्याकडे जातो आणि तुमच्याकडे बोट दाखवत तिला सांगतो,
“तो खूप श्रीमंत आहे त्याच्याशी लग्न कर.
याला म्हणतात,” जाहिरात”!!!!

एका पार्टीत एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते.
तुम्ही तिच्यासाठी ड्रिंक तयार करता.तिला जेवण सर्व्ह करता.
तिची ब्याग उचलता. तिच्यासाठी दरवाजा उघडता.
तिला आपल्या गाडीने घरी सोडताना वाटेत तिला सांगता,
“मी खूप श्रीमंत आहे.माझ्याशी लग्न कर.”
याला म्हणतात,”पब्लिक रिलेशन्स!!!!

एका पार्टीत एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते.
तीच तुमच्या पाशी येते आणि म्हणते,
“तू खूप श्रीमंत आहेस. माझ्याशी लग्न करशील?”
याला म्हणतात , ब्रांड रेकग्निशन!!

एका पार्टीत एक सुंदर मुलगी तुम्हाला दिसते.
तुम्ही तिच्यापाशी जाता आणि सांगता,
“मी खूप श्रीमंत आहे.माझ्याशी लग्न कर.”
.
.
.
ती तुमच्या एक झक्कास कानाखाली वाजवते….
.
.
.
…याला म्हणतात, कस्टमर फीडब्याक!!!!!

Posted by: राजकुमार मडनोली | जुलै 5, 2012

आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते

आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते)

आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया

आजी : हो खरचं

आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन त्याच बागेत जिथे आपण भेटायचो

आजी : ठिक आहे मी येईन ठरल्या वेळी

(आजोबा वाट पाहत आहेत पण आजी येत नाहित)

आजोबा : का गं आली का नाहीस?

आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry हां

( दोघे ही हसतात)

प्रेमाला वय नसतचं हेच खरं…. ♥

Posted by: राजकुमार मडनोली | मे 13, 2012

मी आजही तसाच आहे ………..

मी आजही तसाच आहे ………….

होतो जसा काल मी आजही तसाच आहे।
कालही एकटाच होतो,

मी आजही एकटाच आहे।।
काळोखाची राञ आज माझ्या कूशित आहे,

निरभ्रते आकाश आज काउदास आहे?
पहावयास कोणीच नाही चंद्र आणि नक्षञ आहे..

कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे।।

Posted by: राजकुमार मडनोली | मे 13, 2012

आज तिचा फोन आला ………

आज तिचा फोन आला ,,

आज तिचा फोन आला ,,

शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ,,

स्वतःला सावरून तिन सांगितलं ,अरे माझ लग्न ठरलं ,,

ती सावरली पण तो क्षणात ढासळला ,,

अन मग दोघ्यांच्या आसवांपुढे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ,,

… शब्द सगळे हवेत विरले.,,

ती म्हणाली माफ करशील ना रे मला ??

तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस ?

कर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन राखतेस ,,

या जन्मी नाही झालीस माझी ,,

तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल ,,

ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा असेल ,,

धीर देऊन त्याने तिचा फोन ठेवला,,

कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात जाऊन उभा राहिला ……

Posted by: राजकुमार मडनोली | मे 13, 2012

एक बाई ( हसावे तेवढे कमी )

एक बाई ( हसावे तेवढे कमी )

गंपू : तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?

झंपू : आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती, ‘प्लीज ट्राय लेटर’!

Posted by: राजकुमार मडनोली | मे 13, 2012

हसा आणि हसत रहा…

हसा आणि हसत रहा…

मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला

इंग्रजीचे सर ओरडले. “व्हाय आर यू लेट?

“इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, “सर रस्त्यावर चिख्खल झाला होता

आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली.

माझा पाय मोडला.

म्हणून ऊशीर झाला.

“सर पुन्हा ओरडले, “टॉक इन इंग्लिश!”…

हजरजबाबी मन्याने म्हटले,”सर देयर वॉज

चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. .

हि मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!

जरा जुन्या पोस्ट्स »

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.

%d bloggers like this: