Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 22, 2012

आपली मराठी !!

आपली मराठी भाषा अतिशय लवचिक आहे, एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच
अर्थाचे अनेक शब्द असणे हे चांगल्या आणि समृद्ध भाषेचे लक्षण मराठीत
सुद्धा आहे. एखाद्या शब्दाची फोड केली की, त्यातूननवे शब्द तयार होणे आणि
अनेक शब्द जोडून एक शब्द तोही चांगलाच लांबलचक हा प्रकार मराठीत सुद्धा
आहे. असाच एक शब्द म्हणजे. `एकसमयावच्छेदेकरुन’! याच अर्थ `एकाचवेळी’ असा
होता. असे प्रयोग मराठीत अनेक आहेत. आता ही चार ओळींची कविता
बघा-बाई म्या उगवताच रवीला
दाट घालुनी दधी चरवीला
त्यात गे घुसळताच रवीला
सार काढुनी हरी चरविला
या चार ओळीपैकी पहिल्या ओळीतील रवीचा अर्थ `सुर्य’ असा आहे. दुसऱ्या
ओळीतील चरवी हे `भांडे,’ तिसऱ्या ओळीतील रवी म्हणजे `दही घुसळण्याच
उपकरण’ आणि चौथ्या ओळीतील `चरविला’ या अर्थ आहे `खाऊ घातला’.
गंमत बघा! `रामासा त्या गावे! भजन करावे गाढवाचे!’ या ओळीतील गाढ आणि
वाचे हे दोन शब्द एकत्र केले की `गाढव’ हा प्राणी होतो आणि या ओळीचा अर्थ
गाढवाचे भजन करावे असा होतो.
`मंच’ म्हणजे व्यासपीठ आणि मंचक म्हणजे पकंग. या दोन शब्दांचा घोटाळा
करुन वक्ते अनेकदा विनोद निर्माण करतात.
कविवर्य मोरोपंतानी आपल्या काव्यात शब्द चमत्कृतीचे विपुल प्रयोग केले आहेत.
पु.ल. देशपांडे यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या शाब्दिक कोट्या करुन मराठी
भाषेतील गंमती श्रोत्यपर्यंत पोचविल्या आहेत. पु.ल. देशपांडे एका
मित्राकडे जेवायला गेले. भरपेट जेवण झाल्यानंतर आभार मानताना म्हणाले ,
“जेवण इतकं रुचकर झालं होतं की मी तर `अवाक’ झालो” . ही शाब्दिक कोटी न
समजलेल्या लोकांसाठी खुलासा करीत पु,ल. म्हणाले, “मी इतका जेवलोय की आता
वाकूच शकत नाही”.
`शंकरासी पुजिले सुमनाने’ या ओळीतील सुमनाने या शब्दाचा अर्थ `फुलाने’
असा होतो आनी `चांगल्य मनाने’ असा सुद्धा होते. सुमन नावाच्य व्यक्तीने
असाही होतो.
शब्दाचे उच्चार स्पष्ट असावे लागतात. उच्चारात गडबड केली. तरी भलताच
अनर्थ होऊ शकतो. महिला म्हणजे स्त्री. पण मैला म्हणजे घाण. संबंध म्हणजे
ऋणानुबंध आणि समंध म्हणजे भूत. संवर्ग म्हणजे उपविभाग आणि स्वर्ग म्हणजे
ईश्वराचे निवासस्थान. अनेक जण उच्चारात गफलत करून गोंधळ उडवितात. विनोद
निर्माण करतात. गृह म्हणजे घर आणि ग्रह म्हणजे आकाशातील तारे. गृहदशा आणि
ग्रहदश यातील फरक कळला नाही तर पंचाईतच.
आपल्या मातृभाषेचा आपण सखोल अभ्यास करावा. भाषेचे बारकावे जाणून घ्यावे.
शब्दांचे नेमके अर्थ आणि उच्चार आपल्याला माहित असायलाच हवेत.
मातृभाषेसोबत आपण इतर भाषा शिकायला मुळीच हरकत नाही. पण मातृभाषेवर आपली
हुकूमत असायला हवी. तिचा अभिमान असायला हवा.
सुदैवाने मराठी भाषेने देवनागरी लिपीचा स्वीकार केला आहे त्यामुळे
महाराष्ट्रीयांना त्याच लिपीतील संस्कृत, हिंदी, गुजराथी या भाषा सहज
अवगत करता येतात.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: