Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 24, 2012

दुनिया रे दुनिया…

जगाच्या पाठीवर इतक्या इण्टरेस्टिंग गोष्टी असतात, की ऐकल्यावर आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो. जगाच्या माहिती कोशात फेरफटका मारताना जी मजेशीर माहिती मिळते त्याची रंगत काही वेगळीच. ही माहिती सहज गंमत म्हणून आम्ही तुमच्याशी शेअर करतोय…
– अमेरिकन नागरिक सर्वात जास्त प्रमाणात जेलबंद असतात
– कोलंबियामध्ये सर्वाधिक किडनॅपिंगच्या केसेस होतात
– फिजी, चिली आणि इजिप्तमध्ये मतदान न करणार्‍यास जेल होऊ शकते
– बेल्जिअममधल्या ५५ टक्के महिला मंत्रीपदावर आहेत
– जागतिक स्तरावर सर्वात जास्त पर्यटकांची पहिली पसंती फ्रान्सला आहे
– नॉर्वेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याचीही सोय असते
– जगात एकूण २२ देशांत अर्ध्याहून अधिक जनता अशिक्षित आहे. त्यातील १५ देश आफ्रिकेत आहेत
– सर्वाधिक कॉफी पिणारे नॉर्वेमध्ये आढळतील तर चहाचं सेवन करण्याचं प्रमाण इंग्लंडमध्ये सर्वाधिक आहे
– स्वित्झर्लण्डमध्ये शिक्षकांचा पगार इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ३३,००० डॉलर्स आहे
– न्यूक्लिअर एनर्जीवर इलेक्ट्रिसिटी घेण्याची क्षमता असणारे दहा प्रमुख देश एकट्या युरोपात आहेत
– जगात सर्वाधिक ट्रक्टर्सचा वापर करणारा देश म्हणजे आइसलॅण्ड
– वॉशिंग्टन डीसीमधील मॉल्स हे व्हॅटिकन सीटीपेक्षाही आकाराने मोठे आहेत
– फिनलॅण्ड या देशात करप्शनचा रेट सर्वात कमी आहे
– न्यूझीलण्डच्या महिला वयाची तिशी गाठेपर्यंत मातृत्त्वाची जबाबदारी घेत नाहीत तर अमेरिकेतील २२ टक्के महिला विशीच्या आधीच आई होतात
– फिनलॅण्डमध्ये अर्ध्याहून अधिक डॉक्टर्स महिला आहेत
– ग्वाटामालाच्या स्त्रिया सरासरी साडे अकरा तास काम करतात तर साऊथ आफ्रिकेचे पुरुष फक्त साडे चार तास
– थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघणार्‍यांचं सर्वाधिक प्रमाण हिंदुस्थानात आहे. अमेरिकेत वर्षातून फक्त पाचेक वेळा थिएटरमध्ये फिल्म बघतात आणि मलेशियात त्याहून कमी
– झाम्बिया देशात सरासरी आयुष्यमान ४० वर्षे आहे. इतकं कमी आयुष्यमान असणारे सर्व ३४ देश एकट्या आफ्रिकेत आहेत
– ब्राझिलमध्ये सर्वाधिक मृत्यू हे झाडांवरून पडल्याने होतात
– श्रीलंकेत घटस्फोटाचं प्रमाण अल्प आहे तर स्त्रियांच्या आत्महत्येचं सर्वाधिक आहे
– जगातील ११ प्रमुख देशांतील स्त्रियांना सहाहून जास्त मुलं होतात त्यातील १० देश आफ्रिकेत आहेत
– जर्मनी, बेल्जिअम, हंगेरी आणि स्वीडनमध्ये पगाराच्या अर्धा टॅक्स भरावा लागतो
– दर दुसर्‍या जर्मन आणि इटालियन व्यक्तीकडे गाडी असते
– सर्वाधिक रोड जपानमध्ये आणि रेल्वे ऑस्ट्रेलियात आहेत

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: