Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 24, 2012

पुणे संस्कृतीचे दर्शन बांगड्यातुन…….

पुणे संस्कृतीचे दर्शन बांगड्यातुन…….

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याला शिक्षणाचे
माहेरघर म्हणून ओळखले जाते. देश – विदेशांतील युवक युवती येथे शिक्षण
घेण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये पुण्याबद्दल एक प्रकारे
आत्मीयता जागृत होते. पुणेरी संस्कृती ही देश – विदेशामध्येही मोठ्या
प्रमाणात रूजू लागली आहे. विविध शैक्षणिक क्षेत्रामुळे शिक्षणात क्रांती
घडून आलेली आहे. आयटी क्षेत्रामुळे मोठमोठ्या कंपन्या पुण्यात येवुन
स्थिरावल्या आहेत आहेत. तसेच जाती-धर्माचे लोक येथे राहत आहेत. तरी
सुद्धा पुण्यातल्या संस्कृती – परंपरेमध्ये फारसा बदल घडून आलेला नाही.
तर ती टिकवून ठेवली जात आहे. परंतु २१ व्या शतकात वावरतांना पुणेकरांच्या
लाइफस्टाइल मध्ये बदल होत आहे.

खरे तरं, परदेशातून येणाऱ्या युवक-युवतींनी वेशभुषेत बदल केला आहे.
चुडीदार पंजाबी ड्रेस, साडी यांनी आता लेगीन्स, शॉर्ट टॉप, स्कर्ट,
जीन्स, टी-शर्ट, स्लिवलेस ड्रेसनी जागा घेतली आहे. तसेच दागिन्यामध्येही
दिवसेंदिवस खूप बदल होत असल्याचे आपल्याला जाणवत आहे. पण दांगिन्यांची
त्यातील बदलांची परंपरा खूप जुनी आहे. इतिहासातही याचे दाखले आढळतात आणि
पुणे संस्कृती अधिक प्रमाणात जाणवते. प्रत्येक काळानुरूप उपलब्ध पदार्थ,
वस्तुपासून कलाकुसरीच्या आकर्षक अशा ज्या वस्तु बनवल्या जातात त्यात
दागिन्यांचा प्रामुख्याने उल्लेख आढळते.

पुरातन काळापासुन भारतीय महिलांच्या जीवनात बांगड्यांना महत्त्व आहे.
बालपणापासुन ते वृद्ध होईपर्यंत बांगड्या घालणं ही फॅशन नव्हे, तर
संस्कृती मानली जाते तीच संस्कृती आजही पुण्यात जोपासली जाते. विशेषतः
बांगड्यांमध्ये आढळणारी विविधता हे त्याचेच उदाहरण आहे. माती, लाख, सोने,
चांदी, ऑक्साइड इतर धातू, काच, शंख, प्लॅटिनम, रबर, प्लॅस्टिक, रत्नजडित
इ. अनेक प्रकारच्या बांगड्या आपण पाहतो. प्रत्येक काळात या प्रकारांमध्ये
भरच पडत गेली. आणि बदल होत गेले. पूर्वीच्या काळी हातभर बांगड्या
घालण्याची पद्धत होती आणि आपल्यासाठी निवडीचे पर्याय वाढत गेले आणि
हळूहळू बांगड्या घालण्याची परंपरा चालू झाली. आता त्याचे स्वरूप बदलून एक
फॅशन अ‍ॅक्सेसरीज म्हणून बांगड्यांना वापर होत आहे.

लग्नप्रसंगी बांगड्यांना महत्त्वाचे स्थान असल्याचे जाणवते. उदाहरणार्थ
महाराष्ट्रात हिरवा चुडा, सोन्याच्या बांगड्या, पश्चिम बंगाल मध्ये शाखा
पॉला, पंजाबमध्ये हस्तिदंतापासून बनवलेल्या बांगड्या या नववधुला दिल्या
जातात. तर आपल्या आवडीनुसार महिला शक्यतो वेगवेगळ्या रंगांना पसंती
देतात.

पुणे संस्कृतीत सण वाढदिवसाला जायचे असेल अथवा कॉलेजमध्ये एखाद्या
समारंभात उपस्थित राहायच असल्या मुली ट्रेडी बांगड्यांना पसंती देतात.
त्यातच साडी नेसलेली असेल तर काचेच्या बांगड्याना पसंती देतात. सध्या
बाजारात विविध आकारात वेगवेगळ्या प्रकाराच्या फॅशनेबल बांगड्या पाहायला
मिळतात. त्यात प्लॅस्टिक, काचेच्या तारेच्या, ब्रॉंझ, अलॉय, कॉपरच्या,
नक्षीकाम, चित्र काढलेल्या कोरीवकाम, खड्यांपासुन बनवलेल्या बांगड्या,
प्लेटिंग केलेल्या तसेच कमी-अधिक जाडीच्या देखील बांगड्या उपलब्ध असतात.
सध्या बाजारात बेंटेक्सच्या बांगड्या देखील फॅशनबेल बांगड्या एवढीच
बाजारात मागणी आहे. मात्र त्याची चमक काही दिवसांपुरती मर्यादित राहते.
प्रत्येक प्रदेशानुरूप आणि त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या आवडीनुसार
बांगड्यांचे प्रकार रूजलेले आहेत. पण पुणे ही संस्कृतिक राजधानी म्हणून
ओळखली जाते ते खरं की इथे सर्व बांगड्यांचे प्रकार रूजलेले आहेत. सहसा
परिधान केलेल्या पोशाखाला मॅच होतील अशाच बांगड्या घातल्या जातात.

पूर्वी लग्न ठरलेल्या अथवा लग्न झालेल्या स्त्रियाचं बांगड्या घालत असत
ती आपली संस्कृती म्हणून पण आता संस्कृती जोपासल्या जाण्यासाठी
इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी सध्या कॉलेजच्या जाणाऱ्या युवतीमध्येही
बांगड्या घालण्याची फॅशन रूढ झाली आहे. सलवार-कुर्ता टॉप-जीन्स अथवा
पंजांबी ड्रेस घातला तरी काचेच्या अथवा फॅन्सी बांगड्यांना पसंती मिळते.
कोणत्याही वयाची व्यक्ती कधीही बांगड्या वापरू शकते तसेच हातात ब्रेसलेट
किंवा रिस्ट बँड घालण्याचा ट्रेंड आता पुरूषांमध्येही लोकप्रिय होत आहे.

सांस्कृतिक महत्त्वाखेरिज बांगड्या वापरण्याला संस्कृती सारखेच वैज्ञानिक
महत्त्वदेखिल आहे. स्त्रियांच्या हाताच्या मनगटाजवळ एक अ‍ॅक्युप्रेशरचा
पॉइंट असतो बांगड्या घातल्याने त्या पॉइंटवर आपोआप बांगड्यांचा दाब पडतो
व तो पॉइंट दाबला गेल्याने आरोग्यास फायदा होतो.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: