Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 24, 2012

बाळ माझं मोठ्ठ!!!

बाळ माझं मोठ्ठ!!!

चंपावती नगरीत राधा नावाची एक गरीब विधवा राहात होती. दहा महिन्याच्या
आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी ति प्राणपणानं झटत होती. स्वतःच बाळ तिला
खुप खूप महान वाटायच; त्यापुढं महाराजपदही खुजं भासायचं. ती नेहमी एक
गाणं म्हणायचिअ खड्या आवाजात इतरांनाही ऐकवायची. गाणं होत साधं सोपे,
आपल्या बाळांच्या कौतुकाचं.

“बाळ माझ खूप खूप मोठ,

त्यापुढं महाराजपदही थिटं !

बाळ माझा शूर वीर,

बाळ करील ते करायचं

महाराजांनाही होणार नाही धीर १”

राधेच ते गीत एकदा राजाच्या शिपायांनी ऐकल; ते चिडले, रागावले गाणं
म्हणून राधेनं राजनिंदा केल्याचं, शिपायांनी तिला सांगितलं.

राधेने ते गाणं म्हणू नये, महाराजांची बदनामी करु नये म्हणून शिपायांनी
तिला पुनः पुन्हा बजावलं, पण राधेचं गाणं चालूच राहिल. मग मात्र
शिपायांनी राजाकडे फिर्याद केली, राधेच्या अपराधची मग राजांनेही दखल
घेतली. क्रोधीत कैद करण्याचा त्यांने हुकूम दिला. शिपायांनी राधेला
राजासमोर आणुन उभं केल. राजानं राधेला तिचं म्हणणं सिद्ध करण्यास
फर्मावलं.

“बाई, तुझ बाळ मोठं ग कसं?

आणि त्यापुढं महाराजपद थिटं ग कसं?

तुझा बाळ शूरवीर ग कसा?

आणि राजा भित्रा ससा ग कसा?

सांग, सांग, मला पटवून दे ?

नाहीतर मृत्यूला सामोरी ये.”

डोळ्यांतून आग ओकीत राजा गरजला, राजाच्या त्या रुद्रावतारांने दरबार
स्तब्ध झाला. राधा शांतपणे विनवली, `महाराज माझी चूक झाली ‘

“ते काही चालणार नाही, राजानं हुकूम केला, महाराजपद थिटं कसं? ते
भरदरबारात सांग. मला तुझा बाळ शुर वीर कसा ते प्रत्यक्ष पटवून दे.”
महाराज, मला एक विषारी नाग आणून द्या. अतिभंयंकर जो असेल चार दिवसांच्या
उपाशी आणि टोचून झालेला बेजार’. राजानं सेवकाकडून एक विषारी नाग आणविला,
राधेचा प्रयोग बघाय्ला दरबार खच्चून भरला. त्रिवार लवून राधेनं राजासहं
दरबाराला अभिवादन केलं, मग विषारी नागाला टोपलीतून मुक्त करायला
सांगितलं. फुत्कारणारा नाग फणा काढून तोऱ्यात डोलू लागला, सावजाला कडाडून
डसण्यास पुढं पुढं येऊ लागला. “कुणीही पुढं येउन या नागाला धरावं, आणि
आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करावं.” राजापुढं येत राधा नम्रपणे प्रथम “महाराज
राज्याचे मुख्य म्हणून प्रथम पाळी आपली.” राजा संतापला, रागानं थरथरू
लागला. “हे मूर्ख स्त्रिये, मीच काय; इथली कुणीही व्यक्ती नागाला पकडू
शकणार नाही; सुखाचा जीव धोक्यात घालून कुणी मरणाला सहजी कवटाळणार नाही.”
त्याबरोबर राधा पुढं झाली, राजाचं आणि दरबारातील इतराचंही खुजेपण दाखवत
म्हणाली, “महाराज, आज या दरबारात एक सान व्याक्तिमत्व बसलं आहे. जे य
भंयकर, विषारी नागालाही हसत लिलया खेळविणार आहे.” असं म्हणून राधेनं
बाळाला दरबारात सोडलं. रांगत निर्भय बाळ नागाशी दोरीशी खेळल्यागत खेळत
राहिला. बघता बघता नागानं, बाळाला पूर्ण वेढा घातला आणि जिभेनं तो बाळाचे
चिमुकले पाय चाटू लागला. गुदगुदल्या झाल्यामुळं बाळ हसू लागला. ते दृश्य
पाहून दरबार स्तंभितच झाला, राजाला राधेच्य गाण्याची सत्यता पटली.
गारुड्याला सांगून राजानं बाळाची नागापासून सुटका केली. बाळाच्या
पराक्रमानं राजा खुष झाल. मौल्यवान मोत्यांचा कंठा त्याने बाळाला भेट
दिला. राधेलाही अमाप धन देऊन राजानं निरोप दिला आणि ते गाणं म्हणण्यास
राधेला मुक्त परवाना दिला.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: