Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 24, 2012

शाळा…

नमस्कार,
तसे म्हटले तर ही जागा तशी ओळखीचीच वाटते. वर्ग, बाके, समोरचे मैदान..वगैरे…’शाळा’ चित्रपट सुरु होताना हे दिसणारे चित्र….शाळा…म्हटले की मन कसे सर्रकन मागे जाते. तसेच काहीसे हे झाले. मिलिंद बोकिल यांची ‘शाळा’ ही कादंबरी बऱ्याच लोकांनी वाचलीय आणि वाचलेला प्रत्येकजण तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतोच. माझाही याला अपवाद नाहीच. शाळेत केलेले ‘धंदे’ अजून तसेच्या तसे लक्षात आहेत. जसे की काल घडले असावे. विकास हायस्कूलचा आमचा ‘ड’ वर्ग. आजची आम्ही सारे भेटलो की ती धम्माल अनुभवत असतो. वरचेवर भेटणे होत नाही पण जेव्हा वेळ मिळेल आम्ही एकत्र वेळ घालवतोच. ‘शाळा’ ही कादंबरी अगदी थेट तसाच अनुभव देते. पुस्तक वाचल्यावर अगदी ‘ड’ वर्गाच्या नेहमीच्या शेवटच्या बाकावर बसल्यासारखे वाटले. म्हणून यावर चित्रपट येतोय म्हटल्यावर उत्सुकता अगदी ताणून धरलेली. त्यावर कडी म्हणजे ‘शाळा’चे प्रोमोज वर्षभरापूर्वी पाहिलेले. एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती अनुभवायला मिळणार याचा अंदाज होता. पण ही असलेली उत्सुकता तब्बल आठ-दहा महिने थांबल्यावर रबर अति ताणल्याने तुटतो तशी विरून जाते की काय असे वाटायला लागले. पण ‘शाळा’ एकदाचा रिलीज झालाच. अर्थात पहिल्याच दिवशी बघितला. त्याबद्दल थोडेसे..

युट्युबवर प्रोमो रिलीज केल्यानंतर तब्बल एका वर्षाने हा चित्रपट रिलीज झालाय!

‘शाळा’ पुस्तक बऱ्याचदा वाचल्याने त्यातली पात्रे जसे की जोशी, फावड्या, चित्र्या आणि सुऱ्या ही अगदी तोंडपाठ होती. ती पडद्यावर कशी उतरवली आहेत याची उत्सुकता होती. पहिल्याच फ्रेममध्ये शाळा दिसते. शाळेचे टोल ऐकायला येतात आणि आपण आपल्या शाळेत पोचतो. बाई, शिपाई, नववी-ब असे शब्द बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळतात. बिल्डिंगवर त्या पोरांचे जमणे. एकमेकांची उडवणे. खालून चाललेल्या सर किंवा बाईंची उडवणे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: