Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 24, 2012

|| हृदयाचा एक तुकडा…||

|| हृदयाचा एक तुकडा…||

आज तुझ्या आठवणीत नक्कीच काही खास होत |
स्वप्नांचे एक गाव माझ्या पापण्यांमध्ये वसल होत |

तुझी नी माझी प्रत्येक भेट आज मला त्रास देते |
मोकळ्याच हाती येऊन मला असंख्य आठवणी देऊन जाते |

आठवतय का तू म्हणायचीस कि तू माझा श्वास आहेस |
मग इतके दिवस ह्या श्वासाविना सांग कशी जगत आहेस |

दुरावा आपल्या दोघांतला कसा वाढला कळलच नाही |
मुखवट्या मागचा स्वार्थी चेहरा प्रेमापोटी दिसलाच नाही |

छोटस एक जग माझ तुझ्या हृदयात थाटणार होतो |
आपुलकीने तुझे अश्रू माझे समजून पुसणार होतो |

पण आता तुला निरोप देताना मी मागे वळून पाहणार नाही |
शक्य असेल तर आवाज दे मी शक्यतो तुला टाळणार नाही |

आजवर तुझ्या आठवणीची ओंझल मी जीवापाड जपली आहे |
कदाचित हृदयाचा एक तुकडा आजही तुझ्या जवळ आहे |
आजही तुझ्या जवळ आहे…………………!!

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: