Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 24, 2012

आईचा फोन

आईचा फोन

आज आईचा फोन आला होता
कधी येतोयस बेटा
तो हळवा आवाज
पुन्हा पुन्हा विचारत होता…..

थकलेत रे डोळे आज
आता तुझी वाट पाहून पाहून
तुला न भेटताच
हा जीव जाऊ नये वाहून…

तुझे बाबा पण आज
मनातून तुटत आहेत
पण मी मजबूत आहे असे दाखवण्याचा
खोटाच प्रयत्न ते करत आहेत….

तुझी ताई पण
तू येणा-या वाटेकडेच पाहतेय
तुझा दादा येईल का
तुझ्यासाठी घेतलेली राखी सुद्धा तिला विचारतेय….

सतत बडबडणारा तुझा भाऊ
आता अबोलच असतो
आई कधी येईल ग दादा
अश्रुने डबडबलेला त्याचा डोळा मला विचारत असतो…

यांचे जाऊ दे,पण तिचे काय
जिला तू वचन दिलं आहेस प्रत्येक सुख दुखात साथ देण्याचे
दुखांना पळवून
सुख तिच्या जीवनात भरण्याचे…

तिचे ओठ अबोल असले तरी
तिच्या झुकलेल्या नजरा प्रश्नानाचा वर्षाव करतात
आई कधी येतील हो ते
नकळत च मला पुन्हा पुन्हा सवाल करतात….

किती कारणे सांगू तिला
तुझ्या न येण्याची
बघ पक्षी सुद्धा आपापल्या घरट्यात येत आहेत
कारण आता वेळ आली आहे रे बेटा सर्वांच्या मिलनाची…

ही हाक आहे
माझ्या त्या प्रत्येक हळव्या मातेची
सर्व जगाचे प्रेम,माया,सुगंध सामावलेल्या
त्या प्रत्येक नाजूक आणि सुंदर फुलांची


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: