Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 25, 2012

इंग्रजीतून मराठी

इंटरनेटचा मामला म्हणजे इंग्रजी भाषा गरजेची. आपल्याला ती काही जमत नाही
म्हणजे इंटरनेट..इ-मेल हा आपला प्रांत नव्हे; असं मानून मागे का राहायचं?
इंटरनेटवर असे पर्याय आहेत ज्याद्वारे तुम्ही नुसता इ-मेल नव्हे, तर एक
अख्खा लेख मराठीत टाइप करू शकता.
इंटरनेट वापरातला सगळ्यात कटकटीचा विषय असतो तो म्हणजे इंग्रजी. म्हणजे
होतं काय की आपल्याला इंग्रजी येत नसतं, असं काही नाही. आपल्याला इंग्रजी
चित्रपट कळतात. बातम्या कळतात. वेळप्रसंगी आपण गरजेपुरतं बोलूही शकतो; पण
इंग्रजीत लिहिण्याची आपल्याला सवय असतेच असं नाही. आता माझ्या आईचंच बघा
ना, तिला इंग्रजी येतं अगदी व्यवस्थित, पण या विलायती भाषेबद्दल ती नको
इतकी कॉन्शस आहे. म्हणजे येत असूनही अनेकदा निव्वळ त्या भाषेच्या अनामिक
भीतीमुळे ती चुका करते.
मला ना माझ्या शाळेचे दिवस आठवतात. म्हणजे, मी ना हमखास गणिताच्या पेपरात
चुका करायचे.
आणि त्या चुका कशा असायच्या माहिते?
मला प्रश्नच दिसायचे नाहीत किंवा सगळा प्रश्न सोडवल्यावर उत्तर लिहायचीच
मी विसरून जायचे. किंवा भूमितीतलं एखादं प्रमेय येत असूनही आयत्यावेळी
काहीतरी घोळ घालायचे. त्यामुळे ते चुकायचं..आता जेव्हा मी विचार करते की
असं का व्हायचं, तर मला वाटतं ते माझ्या मनातल्या गणिताच्या भीतीमुळे
व्हायचं. सगळं येत असूनही आपल्याला येणारच नाही किंवा आपण जे काही लिहू
ते चुकेलच या भीतीतून मला जे यायचं त्यातही मी चुका करायचे.
माझ्या आईचं किंवा तुमच्यापैकी अनेकींचंही असंच काहीतरी होत असणार.
इंग्रजीची भीती उगीचच असते मनात. ती कमी करायचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण
त्याचबरोबर आता इंटरनेटवर तुम्ही आरामात मराठीत लिहू शकता. मराठीतून
लिहिण्याची सुरुवात आपण इ-मेलपासून करूयात. ‘जी-मेल’ आणि
‘रेडिफ-मेल’सारख्या किंवा इतरही अनेक इ-मेल सेवा देणार्‍या कंपन्यांनी
त्यांच्या सेवांमध्ये आता मराठीतून लिहिण्याची सोय उपलब्ध करून दिलेली
आहे. उदाहरणाखातर आपण ‘जी-मेल’द्वारे मराठीतून मेल पाठवायची कशी ते
बघूयात.
‘जी-मेल‘च्या तुमच्या अकाउंटला तुम्ही लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला
सगळ्यात पहिले तुम्हाला एक लिंक दिसेल, कम्पोज मेल. या बटणावर क्लिक केलं
की जी मेल लिहायची आहे त्यासाठीचा कोरा कागद किंवा रिकामी जागा समोर
येईल. तुमच्या समोरच्या विन्डोमध्ये, टू, सीसी, बीसीसी, सब्जेक्ट असे
ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. त्याखाली काही चिन्ह दिसतील. त्यात अ हे चिन्ह
असेल. त्यावर क्लिक करायचं. म्हणजे मराठीतून लिहिण्यासाठी तुम्ही सज्ज
होता.
आता प्रत्यक्ष लिहायचं कसं? ते तर अगदीच सोपं आहे. आपण रोमन मराठीत
लिहितो. उदा. चरश पर्रीं ीरीळज्ञरर. मराठी शब्द लिहिताना अक्षरं मात्र
इंग्रजी वापरायची. याला म्हणतात ‘फोनेटिक’ लिपी. तर अ वर क्लिक
केल्यानंतर खालच्या मोकळ्या जागेत तुम्हाला जे काही लिहायचं आहे ते मराठी
शब्द इंग्रजी अक्षरं वापरून लिहायचे.
प्रत्येक शब्द लिहून झाला की स्पेसचं बटण दाबा. ते दाबल्याबरोबर तुमच्या
समोरची इंग्रजी अक्षरं जाऊन मराठी शब्द उमटेल. अशा प्रकारे तुम्ही
तुम्हाला जे काही पत्र लिहायचं असेल ते संपूर्ण पत्र इंग्रजीत लिहू शकता.
यात काही वेळा निराळंच अक्षर किंवा अशुद्ध अक्षर उमटलं तर पुढे न जाता
की-बोर्डवरचं बॅकस्पेसचं बटण दाबायचं की तुम्हाला काही पर्यायी शब्द
विचारले जातील. त्यातला जो योग्य शब्द असेल त्याची निवड करायची. अशा
प्रकारे तुम्ही कितीही मोठं पत्र, लेख जी-मेलच्या माध्यमातून लिहू शकता.
या फोनेटिक लिपीचा फॉण्ट असतो युनिकोड. त्यामुळे तुम्ही लिहिलेला मराठी
मजकूर तुम्ही ज्यांना कुणाला पाठवणार आहात ते तो सहजपणे वाचू शकतात.
आता तुमचा मजकूर लिहून झाल्यावर, टू मध्ये ज्यांना इ-मेल पाठवायची आहे
त्यांचा इ-मेल आयडी टाका, एकापेक्षा जास्त लोकांना तीच इ-मेल पाठवायची
असेल तर इतरांचे इ-मेल आयडीज् सीसी मध्ये टाका. आणि अजूनही कुणाला
पाठवायची असेल पण इतरांना ते समजू नये अशी तुमची अपेक्षा असेल तर त्या
व्यक्तींचे इ-मेल आयडीच बीसीसी मध्ये टाका. ज्या विषयावरचं पत्र असेल तो
विषय सब्जेक्ट मध्ये लिहा. आणि इ-मेल सेंड करा. तुम्ही टाकलेल्या इ-मेल
आयडीवर मेल गेली की युवर मेल हॅज बिन सेंट, असा संदेश तुमच्या स्क्रीनवर
तुम्हाला वाचायला मिळेल.
इंटरनेट ही तशी सोपी भानगड असते. तुम्ही तुमच्या इ-मेल अकाउंटला गेला की,
तिथे असणार्‍या वेगवेगळ्या लिंक्स उघडून बघा. वापरून बघा. त्यातून तुम्ही
आपोआप असंख्य गोष्टी शिकाल. लहान मुलाला कसं एखादं नवं खेळणं आणून दिलं
की तो ते उघडतो. आपल्याला म्हणजे मोठय़ांना वाटतं, पोरानं खेळणं तोडलं,
पण खरं तर तो त्याची उत्सुकता शमवण्याचा प्रयत्न करत असतो. इंटरनेटच्या
बाबतीत आपलं वय कितीही असलं तरी नवं खेळणं मिळालेल्या लहान मुलाप्रमाणे
आपण वागलं पाहिजे. न घाबरता बिनधास्त ते वापरायला शिकलंच पाहिजे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: