Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 25, 2012

जादू झाल्यासारखं आयुष्य बदलून टाकणारं तंत्रज्ञान येतंय, लवकरच.!

जादू झाल्यासारखं आयुष्य बदलून टाकणारं तंत्रज्ञान येतंय, लवकरच.!

तो गॉगल लावला की, आपण एकदम जेम्स बॉण्ड होऊ.! गॉगल डोळ्यावर चढवायचा आणि हवी ती माहिती डोळ्यासमोर हजर.! प्रणव मिस्त्री नावाचा एक भारतीय तरुणही असंच भन्नाट गॅझेट बनवतोय.!

हाय !
गेले काही दिवस एका गॉगलची खूप चर्चा सुरू आहे. उन्हाळा आहे म्हणून तशीही गॉगल, सनग्लासेसची चर्चा आहेच. पण मी ज्याच्याबद्दल बोलतेय त्या ग्लासेस थोड्या वेगळ्या आहेत.
या ग्लासेस आहेत चक्क गुगलने तयार केलेल्या..
गुगलने नुकताच त्यांचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जाहीर केला..
प्रोजेक्टचे नाव आहे – प्रोजेक्ट ग्लास.
आईस स्केटिंग करताना किंवा वेल्डिंग करताना घालतात तसा दिसणारा हा एक चष्मा..
पण हा चष्मा भविष्यातलं तंत्रज्ञानच बदलून टाकणार आहे. कारण सध्या आपल्याला जी माहिती इंटरनेटवर शोधावी लागते किंवा आपल्या फोनवर मिळते तीच माहिती आता चक्क थेट नजरेसमोर दिसू शकेल. कारण हा गुगल गॉगल तुम्हाला दाखवेल सगळी माहिती एकदम हॅण्ड्स फ्री ! हा चष्मा लावला की तुम्हाला ही माहिती छोट्या छोट्या आयकॉन्सच्या स्वरूपात दिसेल. आणि तुमच्या व्हाईस कमांड्स म्हणजे हुकूम देऊन तुम्ही तुम्हाला हवी ती माहिती मिळवू शकता.
म्हणजे काय गम्मत होईल पाहा.
सकाळी उठलात, गॉगल लावून खिडकीच्या बाहेर पाहिलं तर त्या दिवसाचं तपमान, दिवसासाठीचा हवामानाचा अंदाज कळू शकेल.
घराबाहेर पडला तर जिथे जायचंय त्या ठिकाणाचा फक्त नाव घेतलंत की तिथे जायचा रस्ता नकाशाने दिसायला लागेल. आणि हे सगळं तुमच्या दृष्टीला अडथळा न आणता. म्हणजे गॉगल लावून चालायला लागलं तर धडपडायची भीती नाही.
गुगलच्या प्रोजेक्ट एक्सचा हा एक हिस्सा आहे. आणि आता संशोधनाच्या ठराविक टप्प्यावर आल्यावर गुगलने लोकांच्या प्रतिक्रिया आणि अपेक्षा कळाव्यात म्हणून हा प्रोजेक्ट जगजाहीर केलाय. अर्थात यावरूनही चांगल्या – वाईट अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. काहींच्या मते ही टेक्नॉलॉजी जर मार्केटमध्ये आली तर खूप मोठी क्रांती घडेल. तर काहींनी मात्र नाराजीचा सूर काढायला सुरुवात केलेली आहे.
असाच एक प्रयोग एका भारतीय वंशाच्या मुलाने केला होता. त्याचं नाव – प्रणव मिस्त्री. त्याच्या प्रोजेक्टचं नाव- सिक्स्थ सेन्स. हाताच्या बोटावर सेन्सर घालून त्याच्या मदतीने एक इंटरॅक्टिव्ह इण्टरफेस तयार करायचा आणि मग त्याचा वापर फोटो काढण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी करायचा असं प्रणवच्या या प्रोजेक्टचं सूत्र. त्यानेही आपलं या गुगल ग्लासविषयीचं मत मांडलाय. त्याच्या मते ही टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येण्यापूर्वी यात अजूनही काही बदल व्हावे लागतील.
जर खरंच ही टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात आली तर मग इमेल्स, नकाशे, फोटो काढणं, इंटरनेटवरून माहिती शोधणं हे अगदी सोपं होईल. सध्या अँपलच्या आयफोनमध्ये एक सिरी नावाची टेक्नॉलॉजी आहे. जी तुमच्या आवाजी हुकमावरून तुमची कामं करते.
जर गुगल ग्लासेस मार्केटमध्ये आले तर मोबाईल क शकणारी सगळी कामं आपोआप या गॉगलकडे जातील. गुगलने आता या गॉगलचं प्रत्यक्ष टेस्टिंग करायचं ठरवलंय.
हा गॉगल बाजारात कधी येणार.?
– माहीत नाही..!
पण जेव्हा येईल तेव्हा आपल्यातला प्रत्येक जण जेम्स बॉन्ड होईल, कारण असे कूल गॅझेट्स फक्त जेम्स बॉण्डकडेच त्याच्याकडेच असतात.!
या प्रोजेक्ट ग्लासचा एक व्हिडियो गुगल ने यू ट्यूूबवर शेअर केलाय तो नक्की बघा.
ही घ्या त्याची लिंक-


Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: