Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 25, 2012

तुम्हाला हे माहित आहे का?

aa

जिंकायचा बाकी राहिलेला
एकमेव असा केंजळगड
स्वतः शिवरायांनी राजाभिषेकाच्या ४२
दिवस आधी आजच्या दिवशी स्वारी करून जिंकला.
तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्र्वर दरम्यानच्या महादेवडोंगररांगांच्या
एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे.
रोहिडाची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठा पहाडाच्या
डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो.
केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.
बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली. सन १६४८ मध्ये हा किल्ला अदिलशहाच्या
आधिपत्याखाली आला. सन १६७४ मध्ये शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला. वाई
आणि आजुबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते मात्र केंजळगड अजून त्यांच्या ताब्यात आला नव्हता.
म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्र्वसराव किरदत हा किल्ल्याचा किल्लेदार होता,
त्याने मराठांना चोख प्रत्युत्तर दिले. पण मराठांकडूनतो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४मध्ये किल्ला मराठांनी जिंकला.
पुढे १७०१ मध्ये हा गड औरंगजेबाकडे गेला मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ मध्ये परत केंजळगड मराठांच्या ताब्यात आला.
२६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्लिटझर याने दुर्गाचा ताबा घेतला.
….२४ एप्रिल १८१८ – दख्खन ताब्यात
आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक
सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली.त्यात २४
एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल
मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश. २२
एप्रिल १८१८ रोजी मात्र कर्नल
मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले
होते.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: