Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 25, 2012

पिनकोड का व कशासाठी?…………

पिनकोड का व कशासाठी?…………

आधुनिक युगात दूरध्वनी, मोबाइल, इंटरनेट, ई-मेल यांचा वापर सर्वाधिक होत असला तरीही टपालसेवा अजूनही महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. भारतात भाषा व लिपी यांचे वैविध्य असल्याने टपाल वाटप कार्यक्षमतेने व्हावे म्हणून १५ ऑगस्ट १९७२ मध्ये संपूर्ण भारताची ९ पोस्टल इंडेक्स झोनमध्ये विभागणी करण्यात आली. त्यातील ८ झोन हे रिजनल (प्रादेशिक) आणि ९ वा फंक्शनल (विशिष्ट कार्यक्षेत्र) झोन आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात एकाच नावाची अनेक गावे विविध प्रदेशात असू शकतात. पिनकोडमुळे पत्र योग्य ठिकाणी विनाविलंब जाऊ शकते.
पिनकोड हा सहा अंकी असतो.
पहिला अंक : झोन म्हणजे विभाग, दुसरा अंक : उपविभाग, तिसरा अंक : त्या विभागातील सॉìटग डिस्ट्रिक्ट, शेवटचे तीन अंक : पोस्ट ऑफिस क्रमांक अशी याची रचना असते.
झोन क्र. १ – दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगढ, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर.
झोन क्र. २ – उत्तर प्रदेश, उत्तराखंड.
झोन क्र. ३ – राजस्थान, गुजरात, दमण व दीव, दादरा आणि नगरहवेली.
झोन क्र. ४ – महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश व छत्तीसगढ.
झोन क्र. ५ – आंध्र प्रदेश, कर्नाटक.
झोन क्र. ६- तामिळनाडू, केरळ व लक्षद्वीप.
झोन क्र. ७ – पश्चिम बंगाल, अंदमान व निकोबार बेटे, ओरिसा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, मिझोरम.
झोन क्र. ८ – बिहार, झारखंड.
झोन क्र. ९ – आर्मी पोस्ट ऑफिस, फिल्ड पोस्ट ऑफिस.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: