Posted by: राजकुमार मडनोली | मे 13, 2012

खूप अवघड असतं………….

खूप अवघड असतं………….
खूप अवघड असतं, काही गोष्टी विसरणं….
नको असताना सुद्धा हसत हसत स्विकारण…
घडलेल्या घटनेवरती शांतपणे विचार करणं…
‘हातात काही नाही’ जाणवल्यावर मनाला सावरणं…

खूप अवघड असतं एखाद्याला जीव लावणं…
आपलं अस्तित्व विसरून दुसर्यासाठी जगणं..
कधी धडपडून देखील पुन्हा उभारी घेणं…
नव्या स्वप्नांच्या दाही दिशांना प्रवास करणं…

खूप अवघड असतं अपमानाने खचून न जाणं..
आलेल्या अवघड क्षणांवर हसत मात करणं…
आपला आधार हरवला तरी दुसर्याचा आधार बनणं…
दुसर्याच्या समाधानी डोळ्यातून जग बघणं…

खूप अवघड असतं नात्यात गुंतत जाणं…
नात्यात गुंतल्यावर अलगद अलिप्त होणं…
आपल्या अपेक्षा विसरून निस्वार्थी मानाने जगणं..
आपल्यातलाच चांगला आणि वाईट माणूस शोधणं…

खूप अवघड असतं, क्षणाचं मोल जाणण…
प्रत्येक क्षण जगताना उत्कटपणे जगणं…
सुखदुखाच्या छायेखाली आपल्याला फुलवणं..
निराशेच्या गर्तेतून पुन्हा आशेचे पंख पसरवणं..

खूप अवघड असतं स्वप्नातून जागं होणं..
वास्तवाचे चटके सहन करून पुन्हा स्वप्न पाहणं..
जगण्याची धडपड करताना आपलाच आधार बनणं..
अनुभवातून शहाणं होता होता ‘माणूस’ म्हणून जगणं…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: