Posted by: राजकुमार मडनोली | मे 13, 2012

ब्रह्मकमळ – एक निसर्ग चमत्कार

ब्रह्मकमळ – एक निसर्ग चमत्कार

खरतर कमळ हे पाण्या मध्ये येत पण त्याला अपवाद आहे तो ब्रह्म कमळाचा. त्याला कमळ नाही तर फुल म्हटलं पाहिजे. पण त्याचा आकारच खूप मोठा
असतो. हे कमळ जमिनीत लागत. आणि तिथेच त्याची वाढ होऊन साधारण चार पाच वर्षात त्याला कमळ यायला लागतात. आणखी एक विशेष म्हणजे ते कमळ फक्त बरोबर रात्री १२ वाजता पूर्ण फुलत. ते म्हणे अनेक वर्षांतून एकदा..फक्त रात्रीच उमलतं ..ही फुले मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण उमलतात. फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो. त्याचा वास, त्याचं दिसणं मन धुंद करणारं, वेडावणारं..ते पहाणारासुध्दा भाग्यवान, ज्याच्या बागेत ते डोलतं..तो तर सुखी 🙂
या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. या वनस्पतीची लागवड पाने कुंडीत लावून केली जाते. पांढऱ्या रंगाची, सुमारे ४ ते १२ इंच लांबीची ही फुले जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्यात लागतात. कळी मोठी होताच सायंकाळी उमलण्याची प्रक्रिया सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत फूल पूर्ण उमलले जाते. ‘निशोन्मीलित’ अशा या ब्रह्मकमळाची शोभा अवर्णनीय आहे. दले, पाकळ्या, पुंकेसर व स्त्रीकेसर इ. विविध भागांची या ब्रह्मकमळातील रचना कुतूहल निर्माण करणारी आहे. म्हणूनच आकर्षक देहयष्टी नसतानाही या वनस्पतीने मानवी जीवनात विशेष स्थान मिळविले आहे. या बाबतीत त्याचा सुगंधही बऱ्याच अंशी कारणीभूत आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: